शिक्षण हेच विकासाचे साधन आहे याच विचाराने प्रेरित होऊन, तत्कालीन ध्येयनिष्ठ व्यक्तींनी आणि त्यानंतर आतापर्यंतच्या संचालक सदस्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन, महाबळेश्वर / जावली तालुक्यातील अतिदुर्गम ठिकाण ज्ञानगंगा आणली. तथापि कोयना शिक्षण संस्था तळदेव विषयी असणारा आदरभाव अधिकच दुणावला.
तळदेव किंवा जावली, महाबळेश्वर खोऱ्यातील दुर्गम भौगोलिक प्रदेशामुळे येथील परिसरात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना डोंगरदऱ्या, ओढे - नाले ओलांडून शिक्षण घ्यावे लागत होते व ते अत्यंत धोकादायकही होते. तळदेवच्या कोयना शिक्षण संस्थेने म्हणूनच शाळेबरोबरच वसतिगृहे या संकल्पनेचा फार चांगला लाभ येथील विध्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला हे या संस्थेचे आगळेवेगळे वैशिष्टय आहे.
दुर्गम भागातील शाळा असून देखील संस्थेच्या पदाधिकारी, शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिल्याचे शालेय निकालपरंपरेने स्पष्ट होत आहे. कोयना शिक्षण संस्था म्हंटले की तेथे गुणवत्ता असे समीकरण बनले असून, हल्लीच्या काळात ते प्रकर्षाने जाणवत आहे. या संस्थेचे भविष्य उज्ज्वल असून, संस्थेचे आजी माजी विदयार्थी संस्थेचे नाव अधिकाधिक उंचवतील अशी आम्हास खात्री आहे.